शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

तब्बल २० हजार रुपयानं कांदा विकला जाताच भारावलेल्या शेतकºयानं केला अडत्याचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 09:22 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव : एक कांदा मिळतोय चाळीस रुपयांना

ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीत आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया पंधरवड्यापासून कांद्याला चांगला दरराज्यातील अन्य बाजार समित्यांपेक्षा सर्वाधिक दराने कांदा विकला जात आहेअक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील शिवानंद फुलारी यांनी दोन एकर कांदा लागवड केली होती

सोलापूर : गेल्या दीड महिन्यापासून उच्चांकी दराची परंपरा सोलापूरबाजार समितीने कायम ठेवली असून, गुरुवारी कांदा तब्बल प्रतिक्विंटल २० हजार रुपयाने विक्री झाला. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक १५ हजार रुपयाने कांदा विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर बाजार समितीत आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया पंधरवड्यापासून कांद्याला चांगला दर मिळत आहे. राज्यातील अन्य बाजार समित्यांपेक्षा सर्वाधिक दराने कांदा विकला जात आहे. ३० नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९ हजार ५०० रुपयाने कांदा विकला होता. हा दरही अन्य बाजार समित्यांपेक्षा वरचढ होता. डिसेंबर महिन्यात तर दररोज भाव वाढत आहेत. सोमवारी सर्वाधिक प्रतिक्विंटल १३ हजार, मंगळवारी १५ हजार, बुधवारी १५ हजार १०० रुपये तर गुरुवारी तब्बल २० हजार रुपयाने कांद्याचा लिलाव झाला. सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर वाढत असताना अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र दरात फार अशी वाढ झालेली दिसत नाही. 

गुरुवारी  लासलगाव बाजार समितीत कांदा क्विंटलला सर्वाधिक १० हजार रुपये, अहमदनगरला १५ हजार रुपये, चांदवडला ९ हजार ५०० रुपये, उमराणे बाजार समितीत १३ हजार ५०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १४ हजार ९१ रुपयाने विक्री झाल्याचे सांगण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील गुलाब नदाफ यांचा कांदा प्रतिक्विंटल १७ हजार रुपयाने विक्री झाला. 

सात पिशव्या कांदा अन् ६३ हजार रुपये- अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील शिवानंद फुलारी यांनी दोन एकर कांदा लागवड केली होती. दीड एकरापेक्षा अधिक क्षेत्रावरील कांदा काढणी केल्यानंतर अवघ्या ७ पिशव्या कांदा निघाल्याचे शेतकरी शिवानंद फुलारी यांनी सांगितले. यापैकी ६ पिशव्या २० हजार रुपये क्विंटलने विकल्याने ६१ हजार ८०० रुपये तर एक पिशवी अडीच हजार रुपयाने विक्री झाल्याने बाराशे रुपये आले. एकूण ६३ हजार तर खर्च वजा करुन ६२ हजार ६९३ रुपये  पट्टी फुलारी यांना मिळाल्याचे अडते अतिक नदाफ यांनी सांगितले. 

  अन् शेतकºयानेच केला सत्कार- तब्बल २० हजार रुपये क्विंटलने कांदा विकल्याने शेतकरी शिवानंद फुलारी हा भारावून गेला होता. त्याच्या बोलण्यातून हे दिसत होते. कांदा विक्रीसाठी आलेले अनेक शेतकरी गोळा होऊन कौतुकाने पाहत होते. फुलारी यांनी रफिक बागवान व अडते अतिक नदाफ यांचा सत्कार केला. 

१४ कोटी ६२ लाखांची उलाढाल- दरात वाढ झाल्याने बाजार समितीची केवळ कांद्याची १४ कोटी ६३ लाख रुपये उलाढाल झाली़ २२५ ट्रकमधून ४५ हजार १२ पिशव्या कांद्याचे २२ हजार ५०६ क्विंटल वजन झाले. डिसेंबर महिन्यातील तीन दिवसात ३८ कोटी २० लाख ७८ हजार रुपये कांदा विक्रीतून उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारNashikनाशिक