नाशिकनंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही राजू शेट्टींचा भाजपाला दणका
By Admin | Updated: February 15, 2017 15:46 IST2017-02-15T15:46:09+5:302017-02-15T15:46:09+5:30
नाशिकपाठोपाठ आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाला दणका दिला आहे.

नाशिकनंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही राजू शेट्टींचा भाजपाला दणका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - नाशिकपाठोपाठ आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाला दणका दिला आहे.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज होणा-या प्रचारसभेत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केल्यानंतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपासोबत युती करायचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. मात्र, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत जागावाटपात भाजपाने शेतकरी संघटनेला विश्वासात घेतले नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकारी संघटनेचे नेते हंसराज वडघुले यांनी भाजपावर केला आहे.