मुंडेंनंतर महायुतीत सहज संवाद नाही

By Admin | Updated: August 26, 2014 03:51 IST2014-08-26T03:51:01+5:302014-08-26T03:51:01+5:30

शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांतर्फे गोपीनाथ मुंडे हे घटक पक्षांशी बोलत असत़ त्यांच्यानंतर घटक पक्षांशी सहज संवाद करणारी व्यक्ती नाही

After Munde, there is no easy communication between the Mahayuti | मुंडेंनंतर महायुतीत सहज संवाद नाही

मुंडेंनंतर महायुतीत सहज संवाद नाही

पुणे : शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांतर्फे गोपीनाथ मुंडे हे घटक पक्षांशी बोलत असत़ त्यांच्यानंतर घटक पक्षांशी सहज संवाद करणारी व्यक्ती नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी महायुतीत आलबेल नसल्याची कबुली दिली़
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी, आम्हाला किमान १२ जागा दिल्या नाही, तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा सोमवारी दिला आहे. याविषयी विचारल्यावर तावडे म्हणाले, भाजपा आणि शिवसेना यांची घटक पक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा सुरू आहे़ महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ कुणावरही येणार नाही़ यापूर्वी आम्ही नुकसान सोसून महायुती कायम राखली आहे़
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले व्हिजन महाराष्ट्र हे पक्ष म्हणून नसले तरी घटक पक्षांच्या धोरणाचा समावेश करून महायुतीचा जाहीरनामा म्हणून जनतेसमोर येईल़ घटक पक्ष आणि शिवसेनेशी चर्चा पूर्ण होऊन १ ते ५ सप्टेंबरदरम्यान जागावाटप जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: After Munde, there is no easy communication between the Mahayuti