महिनाभरानंतर पौंध आदिवासीवाडी प्रकाशमान

By Admin | Updated: November 4, 2016 02:34 IST2016-11-04T02:34:48+5:302016-11-04T02:34:48+5:30

पौंध आदिवासीवाडीतील ट्रान्सफॉर्मरमध्ये नवरात्रौत्सवात बिघाड झाल्याने ही आदिवासीवाडी महिनाभर अंधारात होती.

After a month, Punda Adivasi Wadi Prakashan | महिनाभरानंतर पौंध आदिवासीवाडी प्रकाशमान

महिनाभरानंतर पौंध आदिवासीवाडी प्रकाशमान


मोहोपाडा : पौंध आदिवासीवाडीतील ट्रान्सफॉर्मरमध्ये नवरात्रौत्सवात बिघाड झाल्याने ही आदिवासीवाडी महिनाभर अंधारात होती. येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याची तक्रारही ग्रामस्थांनी वीज वितरणकडे केली होती. परंतु वीज वितरणकडूनही दुर्लक्ष होत असल्याने दिवाळी सणही ग्रामस्थांना अंधारातच साजरा करावा लागला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आले. या वृत्तामुळे महावितरणला जाग आली. येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्याने महिन्याभरानंतर आदिवासीवाडीत वीजपुरवठा पूर्ववत झाला.
पौंध येथील आदिवासी बांधव डोंगराळ दुर्गम अशा भागात वास्तव्य करीत असल्याने या भागात सर्प, विंचूदंश झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यात येथे वीज नसल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत असत. येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेल्याला महिना लोटला असतानाही वीज वितरण याकडे डोळेझाक करीत असल्याचे लक्षात येताच ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द करण्यात आले. खालापूर वीज वितरणचे सहाय्यक अभियंता विजेंद्र मानकर यांच्याशी संपर्कसाधून याबाबत विचारणा केली. यानंतर महावितरणला जाग आली आणि खालापूर सहा.अभियंता विजेंद्र मानकर यांनीही त्वरित मदत देत भिंगारी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली. गुरु वारी ३ नोव्हेंबर रोजी पौंध आदिवासी वाडीत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याने आदिवासी बांधवांना आनंद झाला आहे. (वार्ताहर)
‘लोकमत’चे मानले आभार : पौंध आदिवासी वाडीत गुरु वारी ३ नोव्हेंबर रोजी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याने आदिवासी बांधवांना आनंद झाला आहे. महिन्यापेक्षा जास्त वेळ अंधारात दिवस काढलेल्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. आता रात्री अंधारात चाचपडावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील आदिवासी बांधवांनी व्यक्त के ली.

Web Title: After a month, Punda Adivasi Wadi Prakashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.