पावसाळ्यानंतर २४ हजार झोपड्यांवर बुलडोझर
By Admin | Updated: June 30, 2016 02:22 IST2016-06-30T02:22:23+5:302016-06-30T02:22:23+5:30
बेकायदा झोपड्या व अतिक्रमणे नालेसफाईच्या कामात अडथळा ठरत असल्याचा बचाव महापालिका प्रशासनाने केला आहे़
_ns.jpg)
पावसाळ्यानंतर २४ हजार झोपड्यांवर बुलडोझर
मुंबई : नाल्यांच्या परिसरातील बेकायदा झोपड्या व अतिक्रमणे नालेसफाईच्या कामात अडथळा ठरत असल्याचा बचाव महापालिका प्रशासनाने केला आहे़ या अतिक्रमणाचा फटका दरवर्षी बसत असल्याने पावसाळ्यानंतर नाल्यांवरील २४ हजार झोपड्या हटविण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे़
नाल्यांवरच वसलेल्या झोपड्यांमुळे नाल्यात कचरा पडतो. तसेच नाल्यांच्या सफाईत अडथळा येतो, अशी तक्रार पालिकाच करत आहे़ अशा १२५ नाल्यांच्या परिसरात क्लीनअप मार्शल्स उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ मात्र पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे ही योजना तूर्तास बारगळली आहे़ माणुसकीच्या दृष्टिकोनातून पावसाळ्याचे चार महिने झोपड्यांवरील कारवाई रोखण्यात येते़ मात्र सफाईच्या कामादरम्यान नाल्यात झोपड्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत़ २४ हजार झोपड्याच रडारवर असणार आहेत़ (प्रतिनिधी)
>नाल्यांचे रुंदीकरण रखडले
स्थानिक रहिवासी कचरा टाकत असलेल्या १२५ नाल्यांची यादी पालिकेने जाहीर केली आहे़
झोपड्या हटविल्यानंतर गाळ काढणे, नाल्यांची रुंदी वाढविणे शक्य होईल, असा पालिकेचा दावा आहे़
छोट्या नाल्यांचे जाळे ४५० कि़मी़ आहे़ तर बॉक्स ड्रेनचे जाळे ६०० कि़मी. आहे़
पाणी समुद्रात नेण्यासाठी १७५ आऊटफॉल आहेत़