पत्नीची हत्या करून 'शीर' घेऊन रस्त्यात फिरणा-याला अटक
By Admin | Updated: October 9, 2015 13:31 IST2015-10-09T13:31:18+5:302015-10-09T13:31:41+5:30
चारित्र्यावरील संशयामुळे कु-हाडीने पत्नीचे शीर धडावेगळं करणा-या एका इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पत्नीची हत्या करून 'शीर' घेऊन रस्त्यात फिरणा-याला अटक
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ - चारित्र्यावरील संशयामुळे कु-हाडीने पत्नीचे शीर धडावेगळं करणा-या एका इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. रामू चव्हाण असे आरोपीचे नाव असून तो पत्नीचे शीर हातात घेऊन रस्त्यावरून चालत जात होता. कात्रज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
एका सोसायटीत वॉचमन म्हणून काम करणा-या रामूचा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्याच रागातून त्याने प्रथम पत्नीची हत्या केली आणि कु-हाडीने तिचं शीर धडावेगळं केलं. पच्नीच शीर आणि कु-हाड हातात घेऊन चालणा-या रामूला पाहून रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी हे वृत्त कळताच त्यांनी रामूला अटक करून पोलिस स्थानकात नेले.