तासाभराच्या गोंधळानंतर हार्बर रेल्वेमार्गावर वाहतूक झाली सुरु

By Admin | Updated: April 24, 2017 09:48 IST2017-04-24T09:47:03+5:302017-04-24T09:48:39+5:30

ऐन गर्दीच्यावेळी हार्बर रेल्वे मार्गावर रुळाला तडा गेल्याने तासाभरासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

After hours of confusion, the traffic on the Harbor line was started | तासाभराच्या गोंधळानंतर हार्बर रेल्वेमार्गावर वाहतूक झाली सुरु

तासाभराच्या गोंधळानंतर हार्बर रेल्वेमार्गावर वाहतूक झाली सुरु

 ऑनलाइन लोकमत 

वाशी, दि. 24 - ऐन गर्दीच्यावेळी हार्बर रेल्वे मार्गावर रुळाला तडा गेल्याने तासाभरासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 
 
वाशी-मानखूर्द दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला होता. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक सुरु झाली आहे. 
 
एकतासभर हा गोंधळ सुरु होता. ट्रेन एकाच जागी बराचवेळ थांबून राहिल्याने नेमकी काय समस्या आहे ते  डब्ब्यातील प्रवाशांना समजत नव्हते. या दरम्यान हार्बर मार्गावरील स्थानकात गर्दी उसळली होती. 
 

Web Title: After hours of confusion, the traffic on the Harbor line was started