पाच वर्षे पूर्ण असल्यावरच शाळेत प्रवेश!
By Admin | Updated: January 5, 2016 03:19 IST2016-01-05T03:19:24+5:302016-01-05T03:19:24+5:30
शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्याचे वय निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यानुसार वयाची ३ वर्ष पूर्ण बालकाला नर्सरीमध्ये प्रवेश मिळेल

पाच वर्षे पूर्ण असल्यावरच शाळेत प्रवेश!
जितेंद्र दखने, अमरावती
शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्याचे वय निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यानुसार वयाची ३ वर्ष पूर्ण बालकाला नर्सरीमध्ये प्रवेश मिळेल. यासंदर्भात शनिवारी आदेश जारी करण्यात आले असून येत्या शैक्षणिक सत्रापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
शिक्षण संचालक महावीर माने यांनी या आदेशान्वये राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना याबाबत सूचना दिल्या असून हा आदेश राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या मंडळाशी संलग्नित शाळांना लागू असेल. खासगी शाळांचे प्रमाण वाढल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यालाही नर्सरीमध्येही प्रवेश मिळत होता. अबोध वयामध्येच त्या बालकांवर शैक्षणिक ओझे लादण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
२०१६-१७ या शैक्षणिक सत्रात येत्या ३१ जुलै रोजी वयाची ३ वर्ष पूर्ण करणाऱ्या बालकाला नर्सरीमध्ये प्रवेश मिळेल. सहा किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या बालकाला २०१९-२०मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश मिळेल.