पराभवानंतर मी संपलेलो नाही - नारायण राणे

By Admin | Updated: May 19, 2014 12:59 IST2014-05-19T11:36:40+5:302014-05-19T12:59:14+5:30

लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदार संघात निलेश राणेंच्या पराभवामुळे मी संपलेलो नाही हे लक्षात ठेवा असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.

After the defeat I did not end - Narayan Rane | पराभवानंतर मी संपलेलो नाही - नारायण राणे

पराभवानंतर मी संपलेलो नाही - नारायण राणे

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १९ - लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदार संघात निलेश राणेंच्या पराभवामुळे मी संपलोय असे समजू नका. नवी जिद्द आणि तडफेने उभं राहून पुन्हा विजय मिळवू असा इशाराच राज्यातील काँग्रेसचे नेते व उद्योग मंत्री नारायण राणेंनी विरोधकांना दिला आहे.  विरोधक, पत्रकार, मित्रपक्ष व पोलिस यांनी युती करुन आमचा पराभव केला असा दावाही राणेंनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे नारायण राणेंचे कोकण भागातील साम्राज्य खालसा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  यापार्श्वभूमीवर नारायण राणेंनी एका मराठी वृत्तपत्रात लेख लिहीला आहे. या लेखात त्यांनी पराभवावर मत व्यक्त केले आहे. कोकण ही माझी जन्मभूमी असून या भागाच्या विकासासाठी गेली २५ वर्ष मी अथक मेहनत घेतली. मात्र यंदा कोकणच्याच मतदारांनी आम्हाला साथ दिली नाही. माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव झाल्याने ही बाब मनाला चटका लावून जाते असे नारायण राणेंनी म्हटले आहे. कोकणी माणसाला आपला माणूस समजून मी चूक केली असेही त्यांनी नमूद केले आहे. 

Web Title: After the defeat I did not end - Narayan Rane