अखेर कोल्हापूरातील टोलधाड रद्द
By Admin | Updated: December 23, 2015 16:15 IST2015-12-23T16:09:26+5:302015-12-23T16:15:08+5:30
कोल्हापूरकरांच्या टोलविरोधी जनआंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल बंद करण्यात

अखेर कोल्हापूरातील टोलधाड रद्द
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - कोल्हापूरकरांच्या टोलविरोधी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
रस्ते विकास प्रकल्पाच्या नावाखाली कोल्हापूरकरांवर लादण्यात आलेल्या जुलमी टोलविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने अखेर कोल्हापुरातील टोल बंद करण्याचा निर्णय घेतला.
सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत कोल्हापूरचा टोल कायमचा रद्द करावा, अन्यथा पुन्हा जनआंदोलन उभारण्याचा इशारा टोलविरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आला होता.