अखेर बाजीराव विहीर शासनाच्या ताब्यात !

By Admin | Updated: June 29, 2015 01:41 IST2015-06-29T01:41:17+5:302015-06-29T01:41:17+5:30

सात-बारा उता-यावर एका खासगी व्यक्तीने केलेला दावा खोडून काढत बाजीराव विहीरच्या सात बारावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद करण्यात आली आहे.

After all, the Bajirao Vihir government is in the possession! | अखेर बाजीराव विहीर शासनाच्या ताब्यात !

अखेर बाजीराव विहीर शासनाच्या ताब्यात !

उपरी (ता. पंढरपूर) : श्रीसंत ज्ञानेश्वर व श्रीसंत तुकोबारायांच्या पालखी मार्गावर बाजीराव विहीर येथे उभे व गोल रिंगण होते. यामुळे या स्थळाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र येथील सात-बारा उताऱ्यावर एका खासगी व्यक्तीने केलेला दावा खोडून काढत या उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक विहिरीला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, ‘चिपळेराव नागनाथ’ नामक व्यक्तीचे नाव ७/१२ उताऱ्यावर लागले होते. मात्र त्यात बदल करून महसूल प्रशासनाने या विहिरीच्या सातबारा उताऱ्यावर शासनाचे नाव लावले. रविवारपासून या विहिरीमधील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ अहल्यादेवी होळकर यांनी ही विहिर बांधली आहे. या ठिकाणी श्रीसंत ज्ञानेश्वर व श्रीसंत
तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल अशी रिंगणे होत असल्याने या स्थळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बाजीराव विहिरीचा स्वतंत्र १३४ असा गट नंबर ७/१२ उतारा आहे. मात्र या उताऱ्यावर चिपळेराव नागनाथ या व्यक्तीचे नाव असून, मध्यंतरीच्या कालावधीत या नावाचा गैरफायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी खोटी कागदपत्रे बनवित ही जागा विकण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे भंडीशेगाव ग्रामपंचायतीने ठराव करीत ही जागा शासनाच्या नावे करण्याची मागणी केली होती.

Web Title: After all, the Bajirao Vihir government is in the possession!