पुण्यात अपघातानंतर टेम्पोने पेट घेतला, चालक जखमी
By Admin | Updated: May 4, 2016 11:52 IST2016-05-04T11:52:39+5:302016-05-04T11:52:39+5:30
पुण्यात दत्तनगर हायवेवर बुधवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला. तीन गाडया एकमेकांवर आदळल्यानंतर मधल्या टेम्पोने अचानक पेट घेतला.

पुण्यात अपघातानंतर टेम्पोने पेट घेतला, चालक जखमी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - पुण्यात दत्तनगर हायवेवर बुधवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला. तीन गाडया एकमेकांवर आदळल्यानंतर मधल्या टेम्पोने अचानक पेट घेतला.
गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे टेम्पो चालकाला बाहेर पडता आले नाही. टेम्पो चालक या अपघातात भाजला आहे. टेम्पो आगीत जळून खाक झाला. भारती विद्यापीठ पोलिस स्थानकाच्या अंतर्गत हा अपघात झाला.