शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात, पण जरा उशीर केलात'; अजित पवारांना उद्देशून अमित शाह यांचे जाहीर वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 06:23 IST

सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क  पिंपरी (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक गट भाजपबरोबर गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे पहिला जाहीर कार्यक्रम झाला. त्याचा उल्लेख करीत शाह म्हणाले, ‘खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशीर केलात,’ त्यावर पवार यांनी थेट हात जोडून दाद दिली.

सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील होते. 

शाह यांनी सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री झाल्याबाबत पवार यांना शुभेच्छा दिल्या. शाह म्हणाले, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा पुण्यात आलो आहे. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसलो आहे. पवार यांना सांगू इच्छितो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. 

इथेनॉलनिर्मिती करा; पैसे केंद्र सरकार देईलएकट्या महाराष्ट्रात ४२ टक्के सहकारी संस्था आहेत. एकीकडे देश, तर एकीकडे महाराष्ट्र असे चित्र आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटलायझेशन केले आहे. रविवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेतली. इथेनॉल बनविणार नाही, असा एकही साखर कारखाना महाराष्ट्रात असू नये, राज्यात सर्वच कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उभारावेत, त्यांना केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले. सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून तत्पर निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

इकडे कशासाठी आलो? पवारांनी सांगूनच टाकलेn उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर कशासाठी आलो आहे, हे सांगून टाकले. पवार म्हणाले, महाराष्ट्राचे भले फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहच करू शकतात. n केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्षे प्रयत्न करत होतो. कोणीही डेरिंग केलं नाही. डेरिंग फक्त अमित शाह यांनी करून दाखवले. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे.n फक्त मोदी आणि शाह हे दोघेच देशाचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतला आहे.अमित शाहंकडून सहकारात मोठे बदल झाले आहेत. शाह यांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो.    - देवेंद्र फडणवीस,     उपमुख्यमंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवार