21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
By Admin | Updated: September 16, 2016 12:55 IST2016-09-16T07:08:21+5:302016-09-16T12:55:09+5:30
तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. भावपूर्ण वातावरणात अरबी समुद्रात गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला

21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर सकाळी 8 च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. अरबी समुद्रात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लालबागचा राजा सकाळी सहाच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. यंदा लालबागचा राजा नेहमीपेक्षा लवकर चौपाटीवर दाखल झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून निघाला होता. त्यानंतर तब्बल 20 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.
गेले १० दिवस मुक्काम केल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या गावी निघाले. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईभरातून लोक गर्दी केली होती. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला.
Mumbai-The 11-day #GaneshChaturthi fest ends amid fanfare(Earlier visuals of "Lalbaugcha Raja" immersion procession) pic.twitter.com/jwXdTw6YRi
— ANI (@ANI_news) September 16, 2016