शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Corona Patient: १२२ दिवसानंतर कोरोना रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर; वजनही एवढे घटले की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 10:28 IST

बीड जिल्हा रुग्णालयात उपचार, ७६ दिवस व्हेंटिलेटरवर. कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. एचआरसीटी स्कोअर १८ आला. ऑक्सिजन लेव्हलही सुरुवातीला केवळ ३३ होती. त्यानंतर स्कोअर कमी होण्याऐवजी वाढला आणि २५ वर पोहोचला.

- सोमनाथ खताळ   लोकमत न्यूज नेटवर्क  बीड : केजमधील ४६ वर्षीय रुग्णाचा एचआरसीटी स्कोअर २५ होता, तसेच ऑक्सिजन लेव्हल अवघी १८ वर आली. तो रुग्ण ७६ दिवस व्हेंटिलेटर व बायपॅपवर होता. अशातही त्याने जिद्द सोडली नाही, तर डॉक्टर, परिचारिकांनीही अथक उपचार केले. त्यामुळेच १२२ दिवसांनी हा रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयाबद्दल पुन्हा एकदा विश्वास वाढला आहे.

केज तालुक्यातील सारूळ येथील श्रीहरी ढाकणे हे २८ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. एचआरसीटी स्कोअर १८ आला. ऑक्सिजन लेव्हलही सुरुवातीला केवळ ३३ होती. त्यानंतर स्कोअर कमी होण्याऐवजी वाढला आणि २५ वर पोहोचला. ऑक्सिजनही १८ वर आला. डॉक्टर, परिचारिकांनी मात्र हार मानली नाही. रुग्णाला ७६ दिवस व्हेंटिलेटर व बायपॅप ठेवले. अखेर त्यांना यातून बाहेर काढण्यात यश आले. शुक्रवारी १२२ दिवसांनी ढाकणे यांना जिल्हा रुग्णालयातून सुटी करण्यात आली. आतापर्यंत सर्वांत जास्त दिवस उपचार घेतलेला रुग्ण म्हणूनही त्यांची नोंद झाली आहे.  

वजन १०७ वरून ६० वरढाकणे रुग्णालयात दाखल झाले तेव्हा १०७ किलो वजन होते. सुटी होतेवेळी त्यांचे वजन ४७ ने कमी होऊन ६० वर आले होते. 

सरकारी रुग्णालयातही सर्वोत्तम उपचार  सरकारी रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळत नाहीत, दुर्लक्ष करतात, असे आरोप केले जातात; परंतु येथेही चांगले उपचार होतात, याचा हा पुरावा आहे. सुविधांबाबत कमी पडत असू; पण उपचारात कोठेच कमी नाही. अतिशय गंभीर असलेला रुग्ण १२२ दिवसांनंतर सुखरूप घरी परततोय, याचा खूप आनंद होतोय.     -डॉ. सुरेश साबळे,     जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस