वकील युवतीवर वकीलानेच केला लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: November 8, 2016 19:51 IST2016-11-08T19:51:28+5:302016-11-08T19:51:28+5:30

येथील न्यायालयातील एका वकिलाने लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर अनेक वेळा बलात्कार केल्याची तक्रार एका ३४ वर्षीय वकील युवतीने सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला

Advocate advocates sexual harassment | वकील युवतीवर वकीलानेच केला लैंगिक अत्याचार

वकील युवतीवर वकीलानेच केला लैंगिक अत्याचार

>ऑनलाइन लोकमत
सिंदखेडराजा, दि. 08 -  येथील न्यायालयातील एका वकिलाने लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर अनेक वेळा बलात्कार केल्याची तक्रार एका ३४ वर्षीय वकील युवतीने सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला सोमवारी ७ नोव्हेंबरला रात्री दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वकील युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, सिंदखेडराजा न्यायालयात वकिली करणारे प्रदीप घेवंदे (वय ५०), रा. देऊळगावराजा यांनी लग्नाचे आमिष दाखवून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध न्यायालयातील घेवंदे यांचे कार्यालय, न्यायालय परिसर तसेच त्यांच्या वाहनात सन मार्च २०१५ ते एप्रिल २०१६ या वर्षभराच्या काळात अनेक वेळा बलात्कार केला. तसेच
सदर युवतीने यासंदर्भात तक्रार देऊ नये म्हणून आमिषही दाखविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकारच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ७ नोव्हेंबर सोमवारी रात्री प्रदीप घेवंदे यांच्या विरोधात कलम २०१, २१४, ५००, ३७६, ५०६ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार एस. एम. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय दिलीप काळे व राजू घोलप करीत आहेत.
सदर प्रकारामुळे सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Advocate advocates sexual harassment