मुस्लिम मतांसाठी शिवसेनेची उर्दूमध्ये जाहीरात
By Admin | Updated: February 18, 2017 11:13 IST2017-02-18T11:13:06+5:302017-02-18T11:13:06+5:30
शिवसेनेने नेहमीच आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे मुस्लिम विरोधी म्हणून पाहिले जाते.

मुस्लिम मतांसाठी शिवसेनेची उर्दूमध्ये जाहीरात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - शिवसेनेने नेहमीच आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे मुस्लिम विरोधी म्हणून पाहिले जाते. पण त्याच शिवसेनेने आता मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क उर्दू भाषेमध्ये जाहीरात केली आहे. शुक्रवारी मुंबईतल्या उर्दू वर्तमानपत्रांध्ये शिवसेनेची जाहीरात प्रसिद्ध झाली होती.
मुंबईमधून देशाला सर्वाधिक कर भरला जातो, तरीही मुंबईकरांवर सर्जिकल स्ट्राईक, उद्योगांचे नुकसान, बेरोजगारी वाढली , रांगेमध्ये गरीबांचा मृत्यू ही प्रचारातील वाक्ये उर्दूमध्ये पेपरमध्ये जाहीरात म्हणून छापण्यात आली होती. वास्तविक शिवसेनेची प्रतिमा लक्षात घेता त्यांनी उर्दूमध्ये केलेली ही जाहीरात अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.
मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या 227 उमेदवारांपैकी फक्त पाच मुस्लिम आहेत. शिवसेनेकडून पहिल्यांदाच अशाप्रकारे मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. गोवंडी, मानखूर्द या मुस्लिम पट्ट्यातून काही जागा निवडून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. तिथे शिवसेनेचे नेते हाजी अराफात आणि साजीद सुपारीवाल जोरदार प्रचार करत आहेत.