‘अॅडव्हान्टेज विदर्भ-२’ला उद्योग खात्याचा अडंगा ?
By Admin | Updated: June 17, 2014 00:49 IST2014-06-17T00:49:53+5:302014-06-17T00:49:53+5:30
विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी दरवर्षी ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ ही गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्याच्या खुद्द मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नांना उद्योग खात्याकडून असहकारा करून अडंगा

‘अॅडव्हान्टेज विदर्भ-२’ला उद्योग खात्याचा अडंगा ?
आॅगस्टमध्ये घेण्याचे प्रयत्न : मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा
चंद्रशेखर बोबडे - नागपूर
विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी दरवर्षी ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ ही गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्याच्या खुद्द मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नांना उद्योग खात्याकडून असहकारा करून अडंगा आणण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
फेब्रुवारी २०१३ मध्ये नागपुरात झालेल्या‘अॅडव्हान्टेज विदर्भ’च्या उद््घाटनाच्या वेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी अशा प्रकारची परिषद आयोजित करण्याचे जाहीर केले होते. २०१४ मध्ये अद्याप ही परिषद झाली नाही. कधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत तर कधी इतर कारणे देत ‘अॅडव्हान्टेज विदर्भ -२’ लांबणीवर टाकण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी २०१४ मध्येच ही परिषद घ्यावी याबाबत मुख्यमंत्र्यांना सुचविण्यात आले होते.
विधानसभेचे अधिवेशन आणि लोकसभा निवडणूक यासाठी ती लांबणीवर टाकण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर एक बैठकही झाली. मात्र ज्या खात्याकडे य्ही बाबा येते त्या उद्योग खात्याकडून या प्रयत्नांना प्रतिसादच मिळत नाही. खरे तर उद्योग खात्यानेच यासंदर्भात प्रस्ताव आणण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. यासंदर्भात पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री आणि उद्योग खात्याकडे पाठपुरावा करीत आहे. येत्या १ किंवा २ आॅगस्ट या दरम्यान घेण्याचे प्रयत्न आहेत. पण ही बाब उद्योग खात्याशी संबंधित आहे, त्यांनीच ते ठरवायचे आहे.
विदर्भात उद्योग क्षेत्राला लाभदायक ठरू शकणारे सर्व घटक उपलब्ध असल्याने त्याचे ‘मार्केटिंग’ करण्यासाठी ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ची संकल्पाना पुढे आली होती. त्याहीवेळी उद्योग खात्याने अडंगा घातला होता. जी.आर. काढण्यास विलंब केला होता. मात्र त्याही नंतर यशस्वी झाली.
देशभरातील ४४० नामांकित उद्योगाचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते व एकूण १४ हजार५३४ कोटीं रुपयांच्या गंतुवणुकीचे २७ करार झाले होते. त्यामुळेच ‘अॅडव्हान्टेज विदर्भ -२’ कडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र वर्ष अर्धे संपले असताना आणि पुढे विधानसभेच्या निवडणुका असतानाही याबाबत अद्यापही राज्य शासनाने काहीही घोषणा न केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हीच परिषद कोकणात होणार असती तर उद्योग खात्याने इतक्या संथपणे प्रतिसाद दिला असता काय? असा सवालही विदैर्भीय जनता करू लागली आहे.