शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त शिक्षकांनाही त्रिस्तरीय निवडश्रेणीचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:02 IST

शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी आवश्यक असलेले शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षण न होताच नाईलाजाने सेवानिवृत्त झालेल्या कोकणातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षणातून सूट देण्याबरोबरच त्रिस्तरीय निवडश्रेणी लागू केली जाणार आहे.

ठळक मुद्देकोकणासह राज्यातील निवृत्त शिक्षकांना फायदा हजारो शिक्षकांना प्रशिक्षणातून सूटशिक्षण मंत्री तावडे यांचे तत्काळ अध्यादेशाचे आश्वासनआमदार डावखरेंचे प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी आवश्यक असलेले शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षण न होताच नाईलाजाने सेवानिवृत्त झालेल्या कोकणातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षणातून सूट देण्याबरोबरच त्रिस्तरीय निवडश्रेणी लागू केली जाणार आहे.

या संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नानंतर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तत्काळ अध्यादेश काढणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचा फायदा कोकणाप्रमाणेच राज्यातील हजारो सेवानिवृत्त शिक्षकांना होणार आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षक संख्येच्या 20 टक्के शिक्षकांना त्रिस्तरीय निवडश्रेणीचा लाभ देण्याची तरतूद आहे. त्यानुसार वरिष्ठ श्रेणीत 12 वर्षांची अर्हताकारी सेवा, शासनविहीत सेवांतर्गत प्रशिक्षण (निवडश्रेणी प्रशिक्षण) पूर्ण आणि त्या संवर्गातील उच्च शैक्षणिक अर्हता धारण अशा तीन अटी आहेत.

त्यातील निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून वर्ग आयोजित केले जातात. मात्र, राज्यात 2009 च्या अखेरपर्यंत निवडश्रेणी प्रशिक्षणवर्ग घेतले गेले नाहीत. त्यामुळे हजारो शिक्षकांकडून केवळ दोन अटीच पूर्ण झाल्या. मात्र, त्यांना आर्थिक लाभ न मिळताच नाईलाजाने निवृत्त व्हावे लागले. सिंधुदुर्गासह कोकणातील पाच जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना शासनाच्या अनास्थेचा फटका बसला होता.

या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तसेच त्यांचे कोकणातील सेवानिवृत्त शिक्षकांना बसलेल्या आर्थिक फटक्याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षणातून सूट देण्याची आग्रही मागणी केली.

या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तत्काळ अध्यादेश काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोकणातील हजारो सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणीचा फायदा होऊन आर्थिक लाभ मिळणार आहेत.कोकणासह राज्यातील निवृत्त शिक्षकांना फायदानिवडश्रेणी प्रशिक्षण न घेतल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते. या शिक्षकांना आता ही वेतनश्रेणी लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकVinod Tawdeविनोद तावडेkonkanकोकण