शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

लग्नाचा खर्च टाळून १४ मुलांना शिक्षिकेने घेतले दत्तक

By admin | Updated: March 31, 2017 02:12 IST

विवाह समारंभाचा खर्च टाळून येथील शाळेच्या उपशिक्षिकेने अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

प्रशांत ननवरे / बारामतीविवाह समारंभाचा खर्च टाळून येथील शाळेच्या उपशिक्षिकेने अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. श्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या उपशिक्षिका प्रियांका पवार यांनी हा आदर्श वस्तुपाठ मांडला आहे. शिक्षण घेताना स्वत:च्या वाट्याला आलेली परिस्थिती इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी पवार यांनी हा निर्णय घेतला. त्याला त्यांच्या जीवनसाथीने सहमती दर्शविली. त्यानंतर पवार यांनी आपल्या विद्यालयातील १४ अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली. त्यासाठी साधेपणानेच त्यांनी विवाह केला.प्रियांका पवार व कडेगाव (जि. सांगली) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक अमोल कदम या नवदांपत्याचा विवाह गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नुकताच पार पडला. या दांपत्याने विवाहखर्चाला कात्री लावून व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च देऊन समाजासमोर नवविचारांची गुढी उभारण्याचेच काम केले आहे. कदम कुटुंबीय हे विवाहाची बोलणी करण्याकरिता पवार यांचेकडे आले. या वेळी अवघ्या ३ तासांत लग्नाची बैठक, सुपारी, साखरपुडा व तत्काळ लग्नाचा निर्णय घेतला. हा विवाह अत्यंत कमी खर्चात काटकसरीने संपन्न झाला. तर विवाहात आहेर भेट म्हणून आलेली रक्कमदेखील विद्यालयाला देण्याचा निर्णय पवार व कदम कुटुंबीयांनी घेतला. या विवाहप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य वसंत माने, पर्यवेक्षक संजय ढवाण, सूर्यकांत भालेराव, गणपतराव तावरे, वसंत मोरे याबरोबरच अनेक रयत सेवक उपस्थित होते.(वार्ताहर)माझे कुटुंब शेतकरी आहे. घरची परिस्थिती पहिल्यापासूनच बेताची होती. संघर्षातूनच शिक्षण, नोकरी मिळाली. प्रतिकूल परिस्थितीनेच मला घडविले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी माझ्या पतींनी प्रोत्साहन दिले. रयत शिक्षण संस्थेची निर्मिती ही त्यागातून झाली आहे. आपण या संस्थेत नोकरी करत आहोत. याची जाणीव ठेवून विवाहखर्चाची रक्कम अनाथ विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतला. विद्यार्थ्यांच्या मदतीचा हा वसा कायम जपणार आहे.- प्रियंका पवार, वधू माझे वडीलही रयत सेवक आहेत. त्यामुळे विवाह खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आम्हा दोन्ही कुटुंबांना अधिक आनंद होत आहे.- अमोल कदम, वर