एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांसाठी प्रशासन सरसावले
By Admin | Updated: August 21, 2014 20:29 IST2014-08-21T20:29:55+5:302014-08-21T20:29:55+5:30
जिल्हाधिकार्यांनी घेतला आढावा: तहसिलदारांना निर्देश

एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांसाठी प्रशासन सरसावले
बुलडाणा : एचआयव्हीबाधित पालकांच्या मृत्यू नंतर अनाथ झालेल्या मुलांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी दिले. आज ह्यलोकमतह्ण मध्ये प्रकाशीत वृत्त्तानंतर जिल्हाधिकारी यांनी निवासी जिल्हाधिकारी देशपांडे यांना या संदर्भात सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी तसेच राज्यशासनाच्या अख्यतारीतील महिला बालकल्याण अधिकार्यांशी संपर्क करून या मुलांसाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सांगीतले. संजय गांधी निराधार योजनेच्या काही अटींमुळे, या निराधार बालकांना शासकीय मदतीचा लाभ मिळत नाही, त्यामुळे एचआयव्हीबाधित रूग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना प्रचंड ससेहोलपट सहन करावी लागते.
एचआयव्हीने मृत्यू झालेल्या दांम्पत्यांच्या मुलांची एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील संख्या ६३ असुन ही मुलं सुद्धा एचआयव्ही बाधीत आहेत. त्यामुळे या मुलांना दूर्धर आजाराकरीता असलेल्या मदतीच्या योजना मधूनही या मुलांना लाभ देता येईल का? याचीही तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. सर्व तहसिलदारांना या संदर्भात एक पत्र पाठविण्यात आले असुन त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मुलांची माहिती घेऊन निराधार योजनेतुन लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.