आदिवासीला आयकराचा धक्का
By Admin | Updated: July 1, 2014 01:47 IST2014-07-01T01:47:01+5:302014-07-01T01:47:01+5:30
ज्या आदिवासींच्या घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांनाच आयकर विभागाने सव्वापाच कोटींच्या व्यवहारावरील आयकर भरण्याची नोटीस पाठविली आहे.

आदिवासीला आयकराचा धक्का
>सव्वापाच कोटी भरण्याची नोटीस : इथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, म्हणो कर भरा
पंकज पाटील - अंबरनाथ
ज्या आदिवासींच्या घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांनाच आयकर विभागाने सव्वापाच कोटींच्या व्यवहारावरील आयकर भरण्याची नोटीस पाठविली आहे. ज्या आदिवासीयांनी पाच हजार रुपये एकगठ्ठा पाहिलेले नाहीत त्यांनी एवढा मोठा आयकर भरावा तरी कसा आणि का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंबरनाथ वडवली (चिखलोली) गावाजवळील तलावाशेजारी राहणा:या काळूबाई वाघे आणि त्यांच्या कुटुंबीयांची 22 एकर जागा तलावालाच लागून होती. सव्र्हे क्रमांक 139 आणि 14क्/7 ही आदिवासीयांची जागा त्यांच्या मर्जीविनाच काही दलालांनी परस्पर लाटली आहे. आदिवासींची जागा विकत घेणा:यांसाठी शासनाने काही कठोर नियम लादलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा नियम म्हणजे ती जागा विकत घेत असताना त्या जागेचा योग्य मोबदला त्या संबंधित आदिवासी शेतक:यांच्या बँक खात्यात जमा करणो गरजेचे आहे.
तसेच बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडणो बंधनकारक आहे. या आदिवासीयांपैकी मोहन हरी मुकणो यांनी आपल्या मालकीच्या जागेपैकी पाच एकर जागा विकण्यासंदर्भात व्यवहार केला. मात्र त्याची फसवणूक करून सर्व 22 एकर जागा काही दलालांनी परस्पर लाटली आहे. तसेच मुकणो यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे भरण्याऐवजी मुंबईच्या एका कॉर्पाेरेट बँकत खाते उघडून 5 कोटी 25 लाख रुपये जमा दाखविण्यात आले. त्या बँक खात्यात रक्कम जमा दाखवित दलालांनी या जागेचा व्यवहार पूर्ण करून ती जागा आपल्या मालकीची केली. हा प्रकार एवढय़ावरच थांबलेला नसून ज्या दिवशी जागा नावावर झाली त्याच्या दुस:याच दिवशी मोहन मुकणो यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती सीताबाई मुकणो यांनी दिली. मुकणो यांच्या मृत्यूच्या दु:खात त्यांचे कुटुंबीय असतानाच या दलालांनी मुकणो यांच्या बँक खात्यात जमा असलेली सव्वापाच कोटींची रक्कम परस्पर काढूनही घेतली. एवढी मोठी रक्कम ही मुकणो यांच्या नावावर बँकेत जमा झाल्याची आणि ती रक्कम परस्पर काढून घेतल्याची गंधवार्ताही त्यांच्या कुटुंबीयांना लागली नाही. करोडो रुपयांची जागा या दलालांनी कवडीमोल भावात फसवणूक करून घेतली व त्या जागेची एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकाला विक्रीही केली.
एवढे मोठे दु:ख पचवित हे आदिवासी आपले जीवन कसेबसे जगत असतानाच त्यातील काळुबाई वाघे यांना आयकर विभागाने नोटीस काढून सव्वापाच कोटींच्या व्यवहारावरील आयकर भरण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. या नोटिसीनंतर हे आदिवासी खडबडून जागे झाले असून त्यांची या दलालांनी मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले. एकीकडे आपल्या हक्काची शेतजमीन गेली आणि दुसरीकडे आयकर विभागाची नोटीस अशा दुहेरी संकटात हे आदिवासी सापडले आहेत.
यासंदर्भात काळूबाई वाघे यांनी सांगितले की, आमची सर्वाची मोठी फसवणूक झाली आहे. यासंदर्भात शासनाने चौकशी करावी; तसेच या पैशांचा अपहार झाला कसा आणि कोणी केला याची चौकशी करावी. त्या चौकशीत अनेक बडे दलाल सामील असल्याचे उघड होईल. तसेच मोहन मुकणो यांचा मृत्यू झाला नसून त्यांची पूर्वनियोजित हत्या झाली असल्याचा आमचा संशय आहे, असा आरोपही त्यांनी केला.
1 आदिवासींची जागा विकत घेताना जे नियम होते त्यांचे पालन झाले नाही.
2 आदिवासींची जागा दुस:याच्या नावे करताना आवश्यक त्या अटींची पूर्तता झालेली नाही.
3 अधिका:यांनी ही जागा दुस:याच्या नावे करताना कागदपत्रे तपासली नाहीत.
4 आदिवासीयांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती घेतली नाही.
5 ज्या खात्यात पैसे जमा केले ती बँक कॉर्पाेरेट बँक असतानाही त्यावर अधिका:यांनी आक्षेप नोंदविला नाही.
6 सर्व कागदपत्रंची तपासणी न करताच 7/12वर दुस:याचे नाव चढविण्यात आले कसे?
7 संपूर्ण 22 एकर जागेवर अनेक वारस असतानाही एकाच्याच नावे पैसे जमा झाले कसे?
8 जागा नावावर झाल्यावर लगेच संबंधित आदिवासीचा मृत्यू झाला कसा?
9 मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैसे कोणी व कसे काढले?