‘आदित्य ठाकरेंचा मोर्चा म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन’

By Admin | Updated: October 19, 2016 02:12 IST2016-10-19T02:12:52+5:302016-10-19T02:12:52+5:30

वसेना-भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची गळती ४० टक्क्यांवर पोहोचली आहे.

'Aditya Thackeray's Front is a demonstration of ignorance' | ‘आदित्य ठाकरेंचा मोर्चा म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन’

‘आदित्य ठाकरेंचा मोर्चा म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन’


मुंबई : मुंबई महापालिकेत दोन दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची गळती ४० टक्क्यांवर पोहोचली आहे. मराठी माणसाच्या दोन पिढ्यांचे शैक्षणिक नुकसान या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षण व्यवस्थेविरोधात काढलेला मोर्चा म्हणजे व्यवस्थेबाबत असणाऱ्या अज्ञानाचे प्रदर्शन असल्याची टीका प्रदेश काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली.
मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वाघमारे म्हणाले की, शिक्षणाबाबत फारच कळवळा, हौस असल्याचा देखावा करण्याची ठाकरे कुटुंबाला सवय आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Aditya Thackeray's Front is a demonstration of ignorance'