हर्षवर्धन जाधवांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 04:28 PM2019-08-29T16:28:26+5:302019-08-29T16:31:09+5:30

हर्षवर्धन जाधवांचा टॅक्टर फॅक्टर खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरला.

Aditya Thackeray janashirvada yatra Tomorrow in Kannad | हर्षवर्धन जाधवांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद धडकणार

हर्षवर्धन जाधवांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद धडकणार

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अपक्ष निवडणूक लढवली होती. तर जाधव यांच्या टॅक्टर फॅक्टरमुळे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील सेनेच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणभूत ठरलेल्या जाधवांच्या मतदारसंघात शुक्रवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद धडकणार आहे. त्यामुळे कन्नड मतदारसंघात हा चर्चेचा विषय बनला आहे.

चंद्रकात खैरे आणि जाधव यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र हाच वाद लोकसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळाला होता. तर हर्षवर्धन जाधवांचा टॅक्टर फॅक्टर खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरला. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात गेला. लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी सेनेवर मोठ्याप्रमाणात टीका केली होती. तर खैरे यांनी सुद्धा आपल्या पराभवाला जाधव यांना दोषी ठरवत, भाजपने जाधव यांना मदत केली असल्याचा आरोप केला होता.

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर जाधव यांनी आता आपल्या पारंपारिक कन्नड मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र त्याच जाधवांच्या कन्नड मतदारसंघातून शुक्रवारी शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा जाणार असून विजय संकल्प मेळावा सुद्धा पार पडणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात पुन्हा लोकसभा निवडणुकीवरून जाधव यांच्यावर खैरे हल्ला चढवण्याची शक्यता आहे. मात्र आदित्य हे आपल्या भाषणातून या विषयी काय बोलणार याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरु आहे.

कन्नडमध्ये उद्या होणाऱ्या मेळाव्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कन्नडमधून सेनेतील इच्छुकांना आदित्य ठाकरेंसमोर शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळाली असल्याने, सेनेचे स्थानिक नेतेमंडळी कामाला लागले असल्याचे सुद्धा बोलले जाता आहे. मात्र जाधव यांचा बालेकिल्ला असलेल्या कन्नड मतदारसंघातील जनता विधानसभा निवडणुकीत खरच सेनला आशीर्वाद देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Aditya Thackeray janashirvada yatra Tomorrow in Kannad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.