शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:06 IST

खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. विरोधी पक्ष म्हणून आपले शेवटचे अधिवेशन असेल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

रत्नागिरी - बाप चोर, पक्ष चोर, आता हिंदुहृदयसम्राट पदवी चोरली. किती निर्लज्जपणा? त्याचा कळस गाठलाय, किती मास्क लावून फिरणार? किती दिखावा करणार,यापेक्षा एखादी चांगली एक्टिंग करा.जी तुम्ही करताय. हे सगळे काहीही केले तरी गद्दारीचा शिक्का माथ्यावर लागलाय तो पुसला जाणार नाही. ३१ डिसेंबरनंतर हे सरकार जाणार म्हणजे जाणार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या सगळीकडे आपले सरकार येणार असं वातावरण बनलेले आहे. महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून येणारी २०२४ ची निवडणूक आपली आहे. लोकसभेत आणि विधानसभेत हे घडवून दाखवायचे आहे. केवळ लोकसभा, विधानसभेत बहुमत आणायचं नाहीतर राज्यसभा, विधान परिषदेतील प्रत्येक जागा आपल्याला निवडून आणायची आहे. आपल्याला प्रत्येक मत गरजेचे आहे. प्रत्येक मत इतिहास घडवू शकतो. आमदार बनल्यावर सभागृहात महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण बोलता येते. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात जे काही घडलेले आहे.ते खोडून पुन्हा सुवर्ण अक्षरात पुन्हा घडवायचा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक निवडणुका होणे गरजेचे आहे. ३१ डिसेंबरला सरकार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र करावेच लागेल. खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. विरोधी पक्ष म्हणून आपले शेवटचे अधिवेशन असेल. २०२४ ला केंद्रात आणि राज्यात परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणारच ही शपथ आपण घेऊन बाहेर पडलो आहे. गेल्या ५-६ वेळा आपण मुंबई पदवीधर निवडणूक जिंकत आलो आहोत. सगळे सुशिक्षित पदवीधर शिवसेनेसोबत असतो. मुंबई आणि कोकण हे महत्त्वाचे नाते आहे. मागच्यावेळी आपण कोकण पदवीधर निवडणूक लढवायचे ठरवले. पण थोडक्यात पराभूत झालो. शिवसेनेची ताकद प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात दिसते. कोकण पदवीधर निवडणूक ही १०० टक्के शिवसेनेची आहे. त्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणारच आहे असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. 

शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तरमी पोस्टर पाहिले नाही. त्या पोस्टरचा अर्थ असा आहे की वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचारांचे वारसदार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे कधीही स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेत नाहीत, कधीच घेणार नाहीत.तेवढे मोठे आम्ही कुणी नाही. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांच्यापेक्षा कुणी मोठे नाही असं प्रत्युत्तर मंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे