निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:06 PM2023-11-24T14:06:23+5:302023-11-24T14:06:54+5:30

खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. विरोधी पक्ष म्हणून आपले शेवटचे अधिवेशन असेल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

Aditya Thackeray criticized Chief Minister Eknath Shinde | निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर 'बाण'

निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर 'बाण'

रत्नागिरी - बाप चोर, पक्ष चोर, आता हिंदुहृदयसम्राट पदवी चोरली. किती निर्लज्जपणा? त्याचा कळस गाठलाय, किती मास्क लावून फिरणार? किती दिखावा करणार,यापेक्षा एखादी चांगली एक्टिंग करा.जी तुम्ही करताय. हे सगळे काहीही केले तरी गद्दारीचा शिक्का माथ्यावर लागलाय तो पुसला जाणार नाही. ३१ डिसेंबरनंतर हे सरकार जाणार म्हणजे जाणार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या सगळीकडे आपले सरकार येणार असं वातावरण बनलेले आहे. महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून येणारी २०२४ ची निवडणूक आपली आहे. लोकसभेत आणि विधानसभेत हे घडवून दाखवायचे आहे. केवळ लोकसभा, विधानसभेत बहुमत आणायचं नाहीतर राज्यसभा, विधान परिषदेतील प्रत्येक जागा आपल्याला निवडून आणायची आहे. आपल्याला प्रत्येक मत गरजेचे आहे. प्रत्येक मत इतिहास घडवू शकतो. आमदार बनल्यावर सभागृहात महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण बोलता येते. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात जे काही घडलेले आहे.ते खोडून पुन्हा सुवर्ण अक्षरात पुन्हा घडवायचा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक निवडणुका होणे गरजेचे आहे. ३१ डिसेंबरला सरकार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र करावेच लागेल. खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. विरोधी पक्ष म्हणून आपले शेवटचे अधिवेशन असेल. २०२४ ला केंद्रात आणि राज्यात परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणारच ही शपथ आपण घेऊन बाहेर पडलो आहे. गेल्या ५-६ वेळा आपण मुंबई पदवीधर निवडणूक जिंकत आलो आहोत. सगळे सुशिक्षित पदवीधर शिवसेनेसोबत असतो. मुंबई आणि कोकण हे महत्त्वाचे नाते आहे. मागच्यावेळी आपण कोकण पदवीधर निवडणूक लढवायचे ठरवले. पण थोडक्यात पराभूत झालो. शिवसेनेची ताकद प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात दिसते. कोकण पदवीधर निवडणूक ही १०० टक्के शिवसेनेची आहे. त्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणारच आहे असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. 

शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तर
मी पोस्टर पाहिले नाही. त्या पोस्टरचा अर्थ असा आहे की वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचारांचे वारसदार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे कधीही स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेत नाहीत, कधीच घेणार नाहीत.तेवढे मोठे आम्ही कुणी नाही. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांच्यापेक्षा कुणी मोठे नाही असं प्रत्युत्तर मंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले. 

Web Title: Aditya Thackeray criticized Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.