शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 13:47 IST

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर केलं ट्विट

Aditya Thackeray vs Eknath Shinde, Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट राज्य मंत्रिमंडळात सामील झाला आणि विविध चर्चा रंगू लागल्या. अजित पवार गटाच्या समावेशानंतर शिंदे गट नाराज असल्याचे सातत्याने बोलले जात होते. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याने सत्तेतून बाहेर पडल्याचे शिंदे गटाने वर्षभरापूर्वी सांगितले होते. पण अखेर शुक्रवारी जाहीर झालेल्या खातेवाटपात अजित पवार यांनाच अर्थमंत्रीपद मिळाले. नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर खातेवाटप जाहीर केले. यात अजित पवारांसह छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांनाही वजनदार खाती मिळाली. पण शिंदे गटाच्या आमदारांच्या माथी अद्याप प्रतिक्षाच आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी ट्विट करत शिंदे गटाच्या आमदारांना खोचक टोला लगावला.

आदित्य ठाकरेंचे ट्विट-

"चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झालं... पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला", अशी त्यांनी ट्विटची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना टोला लगावला. "आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!", अशा खोचक शब्दांत त्यांनी ट्विट केले आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

दरम्यान, कालच्या खातेवाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग अशी सर्व खाती ठेवण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते दिले गेले.

इतर खाती आणि मंत्री

  • छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • दिलीप वळसे पाटील - सहकार
  • राधाकृष्ण विखेपाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  • सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • हसन मियाँलाल मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  • चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
  • गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
  • संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
  • धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
  • सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
  • संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय रविंद्र सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण
  • रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), 
  • अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  • दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा
  • धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
  • अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
  • संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  • मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  • अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरे