शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 22:18 IST

Aditya Thackeray : शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

मुंबई - राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जून महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. मात्र उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा कारभारापेक्षा सरकारवरच लक्ष्य केंद्रित केलं जातं तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ४१ दिवस लागतात. त्यातही अजून एका विस्ताराचं आश्वासन दिलं जातं. त्यानंतर खातेवाटपाला ५ दिवस लागतात. त्यामध्येही सत्तासंतुलनाचा असमतोल दिसून येतो. तसेच यामध्ये महिलांना आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधित्व न मिळणे हे निराशाजनक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती ठेवण्यात आली आहेत.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार