शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिया खान मृत्यू प्रकरणात आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजवर आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 22:00 IST

अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर मुंबई सेशन्स कोर्टानं आरोप निश्चित केले आहेत. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत सूरज पांचोलीवर कलम 306 अन्वय हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

मुंबई : अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर मुंबई सेशन्स कोर्टानं आरोप निश्चित केले आहेत. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत सूरज पांचोलीवर कलम 306 अन्वय हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. परंतु सूरजचे वकील प्रशांत पाटील यांनी सूरज पांचोली हा निर्दोष असल्याचं सांगितलं आहे.या प्रकरणात 14 फेब्रुवारीपासून साक्षीदारांच्या जबाबाची तपासणी होणार आहे. 3 जून 2013 रोजी जिया खानने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जिया खानच्या आत्महत्ये प्रकरणात मुंबई पोलिसांना जियाने लिहिलेले तीन पानी पत्र मिळाले होते. त्यात सूरजशी असलेले संबंध आणि त्याच्याकडून होणा-या शारीरिक व मानसिक छळणुकीसंदर्भात तिने लिहिले होते. ऑक्टोबर 2013मध्ये जियाची आई रबिया खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं होतं.

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीलाही सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्ते उपस्थित नसल्याने उच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगितीही दिली होती. त्यानंतर पुन्हा या खटल्यावर सुनावणी झाली आहे. ‘या प्रकरणात दोन तपास यंत्रणा सहभागी आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या केसमध्ये सरकारला विशेष सरकारी वकील नेमण्याची मुभा आहे का? हा प्रश्न उपस्थित केला,’ असे न्या. ए. के. मेनन यांनी गेल्या सुनावणीत म्हटले होते. विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीनंतर सत्र न्यायालयाने सीबीआयला याबाबत अर्ज करण्याची परवानगी दिली नाही, असे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले होते. 

टॅग्स :Suraj Pancholiसुरज पांचोली