शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 10:31 IST

धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यातच आता विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुद्धा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. 

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वीच कळविल्याची माहिती आहे. तसेच, यासंदर्भात अजित पवार यांनाही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले होते. तसेच, धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे, असे सांगत गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गाने करणे वारंवार शक्य होत नाही, असेही धर्मराबाबा आत्राम म्हणाले आहेत. 

प्रकृतीचे कारण की आणखी काही?लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम हे इच्छुक होते. यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुद्धा केली होती. पण उमेदवारी न मिळाल्याने ते काहीसे नाराज होते. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षापासून त्यांचा दुरावा वाढल्याची चर्चा होती. अशातच त्यांनी आता गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांच्या निर्णयामागे नेमके प्रकृतीचे कारण आहे की आणखी काही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस