शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

गोवरग्रस्त भागात अतिरिक्त लस; उद्रेकाचा परिसर कोणता, हे राज्य सरकार ठरविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 09:11 IST

ज्या भागांमध्ये सहा ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवरबाधितांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल तिथे या बाळांमध्ये गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी.

मुंबई  : गेल्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत गोवराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले असून, काही ठिकाणी या आजाराचा उद्रेक झाला आहे. त्या भागांत उद्रेक प्रतिसाद लसीकरण करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला दिल्या आहेत. 

या लसीकरणांतर्गत ज्या भागांमध्ये गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे तिथे नियमित लसीच्या नेहमीच्या डोसव्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी, असे सूचित करण्यात आले आहे. काेणत्या परिसरात उद्रेक झाला आहे, ते ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे.  नीती आयोगाचे आरोग्य सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत देशातील गोवराच्या साथीचा आढावा घेण्यात आला. 

निर्णय काय? -- ज्या भागांमध्ये सहा ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवरबाधितांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल तिथे या बाळांमध्ये गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी.- या अतिरिक्त मात्रेनंतरही या बालकांचे गोवर आणि रुबेला लसीकरण नियमित वेळापत्रकानुसार करण्यात यावे.  

भिवंडीतील आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू -- पालिकेच्या माहितीनुसार, बुधवारी भिवंडी येथील आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचे लसीकरण अपूर्ण झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. - मुंबईत दिवसभरात गोवराच्या १३ रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या २३३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १२ मृत्यूंची नोंद झाली आहे. - गोवराच्या नियंत्रणासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत, लसीकरणावर भर, समुपदेशन याद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.  

टॅग्स :State Governmentराज्य सरकारHealthआरोग्यMumbaiमुंबई