मुरुड तालुक्याला अतिरिक्त वीजपुरवठा

By Admin | Updated: September 5, 2016 03:05 IST2016-09-05T03:05:19+5:302016-09-05T03:05:19+5:30

सध्या मुरुड तालुक्याला सुपेगाव-कोकबन, धाटाव-रोहा व भालगाव येथून वीजपुरवठा होत असतो.

Additional electricity supply to Murud taluka | मुरुड तालुक्याला अतिरिक्त वीजपुरवठा

मुरुड तालुक्याला अतिरिक्त वीजपुरवठा


नांदगाव/ मुरुड : सध्या मुरुड तालुक्याला सुपेगाव-कोकबन, धाटाव-रोहा व भालगाव येथून वीजपुरवठा होत असतो. या वीजवाहिन्या घनदाट जंगलातून गेलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या दिवसात झाडांची फांदी अथवा तत्सम कारणाने अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असतो. एकदा का वीज गायब झाली की वीजवाहिनी घनदाट जंगलातून असल्याने सहा ते सात तास वीज न आल्याने शहरी व ग्रामीण भागातील जनता नेहमीच त्रस्त असते. ही परिस्थती लक्षात घेऊन आमदार पंडित पाटील यांनी पाठपुरावा केल्यानेमुरु ड तालुक्यातील काही भागाला अतिरिक्त पुरवठा होण्यासाठी व गणपती उत्सवात ओरड होऊ नये या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील मांदाड गावातील फिडरवरून वीज देण्यात आली आहे. यासाठी ३३ केव्ही अंडर ग्राऊंड केबल कायमस्वरूपी टाकण्यात आली आहे. त्यामुळे जर काही कारणास्तव वीज गेल्यास आता या भागातून त्वरित वीजपुरवठा केला जाणार आहे.
येथून वीजपुरवठा झाल्याने मुरु ड शहर, आगरदांडा, खार आंबोली, शिघ्रे आदी भागाला बत्ती गुलपासून दिलासा मिळणार आहे. वीजवाहिनी लोकार्पण सोहळा नुकताच आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, मोतीराम पाटील, विजय गिदी, विनायक धामणे, मुरु ड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर आदी उपस्थित होते. यावेळी मुरु ड वीज मंडळाचे उप मुख्यकार्यकारी अभियंता सचिन येरेकर म्हणाले की, जर मुरु डला होणारा वीजपुरवठा धाटाव-रोहा येथून खंडित झाला तर त्वरित नव्याने काम झालेले मांदाड फिडर येथून वीज घेता येणार आहे. मांदाड फिडरमुळे कमी दाबाने होणारी वीज समस्या कायमस्वरूपी नष्ट होणार आहे. मुरु ड सबस्टेशनचे काम परिपूर्ण होईपर्यंत ही सुविधा ग्राहकांना मिळणार असल्याचे येरेकर यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
>मुरु डला होणारा वीजपुरवठा धाटाव-रोहा येथून खंडित झाला तर आता त्वरित नव्याने काम झालेले मांदाड फिडर येथून वीज घेता येणार आहे, अशी माहिती वीज मंडळाचे उप मुख्यकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी सांगितली.

Web Title: Additional electricity supply to Murud taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.