अपर जिल्हाधिकारी, तहसीलदाराविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: September 3, 2015 00:50 IST2015-09-03T00:50:21+5:302015-09-03T00:50:21+5:30
विभागीय चौकशीतून निर्दोष बाहेर काढण्याबरोबरच अमरावती विभागात बदलीची शिफारस करण्यासाठी तलाठी महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून अपर

अपर जिल्हाधिकारी, तहसीलदाराविरुद्ध गुन्हा
देगलूर (जि. नांदेड) : विभागीय चौकशीतून निर्दोष बाहेर काढण्याबरोबरच अमरावती विभागात बदलीची शिफारस करण्यासाठी तलाठी महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्याविरोधात देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या अमरावती महसूल विभागातील अचलपूर तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत तलाठी महिलेने तक्रार दिली आहे. ३० डिसेंबर २०१४ ते ६ एप्रिल २०१५ या काळात तहसीलदार डापकर व अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी आपल्या बदलीच्या शिफारशीसाठी तसेच विभागीय चौकशीतून निर्दोष बाहेर काढतो, असे सांगत वारंवार भ्रमणध्वनीद्वारे तसेच समक्ष बोलावून सलगी करण्याचा प्रयत्न केला. शारीरिक सुखाची मागणी केली, अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. आरोपाच्या पुष्ठ्यर्थ वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून केलेल्या संभाषणाची ध्वनिफीत त्यांनी दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या पथकाने महिलेचा जबाब ऐकल्यानंतर दिवसभर चौकशी केल्यावर रात्री दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)