व्यसनांना प्रतिष्ठा मिळू लागल्यानेच व्यसनधिनतेचे प्रमाण वाढले - मुक्ता दाभोळकर
By Admin | Updated: August 8, 2016 17:46 IST2016-08-08T17:20:40+5:302016-08-08T17:46:26+5:30
आज समाजात हिंसाचार वाढला आहे. व्यसनाधिनताही मोठया प्रमाणात वाढलेली आहे. या व्यसनांना प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे. मात्र ही प्रतिष्ठा काढून घेण्यासाठी युवक युवतींनी

व्यसनांना प्रतिष्ठा मिळू लागल्यानेच व्यसनधिनतेचे प्रमाण वाढले - मुक्ता दाभोळकर
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 08 - आज समाजात हिंसाचार वाढला आहे. व्यसनाधिनताही मोठया प्रमाणात वाढलेली आहे. या व्यसनांना प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे. मात्र ही प्रतिष्ठा काढून घेण्यासाठी युवक युवतींनी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या अॅड़ मुक्ता दाभोळकर यांनी केले.
सोमवारी संगमेशवर महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, रोटरी क्लब आॅफ जुळे सोलापूर, रोट्रॅक्ट कलब संगमेश्वर कॉलेज आणि सोलापूर विद्यापीठ एनएसएस विभाग यांच्यातर्फे आयोजित युवा संकल्प परिषदेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक बी़पी़पाटील, प्राचार्य डी़डी़ पुजारी, अंनिसचे अध्यक्ष व्ही़डीग़ायकवाड, झुबीन अमेरिया यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी प्रास्ताविक प्रा. व्ही़ वाय विटेकर यांनी केले.
पुढे बोलताना, अॅड़ मुक्ता दाभोळकर म्हणाल्या की, समाजात वाढलेली व्यसनाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी युवकांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. व्यसनी लोक ३१ डिसेंबर रोजी मोठा सण साजरा करतात. दारू मोठया प्रमाणात पीत असतात. त्यादिवशी युवक व युवतींनी एकत्रित येऊन दारू पिणा-या लोकांना कपभर मसाला दूध देऊन व्यसनांपासून दूर करणे आवश्यक आहे़ यावेळी धर्मराज काडादी यांनीही आपले विचार व्यक्त केले.