अभिनेत्री लीना पॉलने गंडविले हजारोंना
By Admin | Updated: June 3, 2015 03:53 IST2015-06-03T03:53:40+5:302015-06-03T03:53:40+5:30
देशभरातील सुमारे एक हजार गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री व मॉडेल लीना पॉल (२६), तिचा भागीदार सेकर चंद्रशेखर (२५) यांच्यासह

अभिनेत्री लीना पॉलने गंडविले हजारोंना
मुंबई : देशभरातील सुमारे एक हजार गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री व मॉडेल लीना पॉल (२६), तिचा भागीदार सेकर चंद्रशेखर (२५) यांच्यासह एकूण सहा जणांना आर्थिक गुन्हे विभागाने गजाआड केले. उर्वरित आरोपींमध्ये गीतकार हसरत जयपुरी यांचे दोन पुत्र व नातू यांचा समावेश आहे. त्यांना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त धनंजय कमलाकर म्हणाले, लीना व सेकर यांनी मुंबईत लायन ओक इंडिया नावाने कंपनी सुरू केली. किंग ग्रुप नावाने या कंपनीचे कार्यालय अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलमध्ये सुरू होते. लीना व सेकर यांनी दर महिन्याला बोनससह २० टक्के परतावा, टाटा नॅनो कार अशी आमिषे दाखवून बोगस योजनांकडे गुंतवणूकदारांना आकर्षित केले. सुमारे एक हजारपेक्षा जास्त गुंंतवणूकदारांनी पाच हजार ते तीस लाखांपर्यंतची गुंतवणूक या फसव्या योजनांमध्ये केल्याची माहिती यामध्ये मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.