अभिनेत्रीची बदनामी करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: October 14, 2016 02:52 IST2016-10-14T02:52:31+5:302016-10-14T02:52:31+5:30

दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, तसेच मिस इंडिया २०१० असलेली नेहा हिंगे हिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाइल तयार

The actress has been accused of defame the actress | अभिनेत्रीची बदनामी करणाऱ्यास अटक

अभिनेत्रीची बदनामी करणाऱ्यास अटक

पुणे : दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, तसेच मिस इंडिया २०१० असलेली नेहा हिंगे हिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाइल तयार करीत, नवीन ग्रुप तयार करून त्यावर अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हे शाखेने अटक केले.
विशेष म्हणजे, या तरुणाने तयार केलेल्या वैशाली नावाच्या ग्रुपमध्ये तो नेहा ही त्याची मैत्रीण असल्याचे भासवत होता. विनीत रघुवंश ओझा (वय २२, रा. रेणुकाधाम सोसायटी, देवळाली, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी नेहा हिने सांगवी पोलीस ठाण्यात १४ जुलै रोजी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा हिच्या नावाचा वापर करून आरोपीने इंस्टाग्रामवर नेहा डॉट हिंगे या नावाची बनावट
प्रोफाइल तयार केली. त्यावर तिचा फोटो अपलोड करून वैशाली नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपवर त्याने अश्लील मेसेज पाठवून शिवीगाळ केली. याचा मानसिक त्रास होत असल्यामुळे नेहाने असे मेसेज पाठवू नका, असे सांगितले होते. सायबर गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक विजयमाला पवार यांना आरोपीबाबत
मिळालेल्या माहितीवरून
ओझाला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The actress has been accused of defame the actress