अभिनेत्रीची इंस्टाग्रामवर बदनामी करणा-याला अटक
By Admin | Updated: October 13, 2016 19:01 IST2016-10-13T19:01:04+5:302016-10-13T19:01:04+5:30
दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री तसेच मिस इंडिया -2010 असलेली नेहा हिंगे हिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार करीत नवीन ग्रुप तयार

अभिनेत्रीची इंस्टाग्रामवर बदनामी करणा-याला अटक
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री तसेच मिस इंडिया -2010 असलेली नेहा हिंगे हिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार करीत नवीन ग्रुप तयार करुन त्यावर अश्लिल मेसेज पाठवणा-या तरुणाला सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने तयार केलेल्या वैशाली नावाच्या ग्रुपमध्ये तो नेहा त्याची मैत्रिण असल्याचे भासवत होता.
विनीत रघुवंश ओझा (वय 22, रा. रेणुकाधाम सोसायटी, देवळाली, नाशिक) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नेहा हिने सांगवी पोलीस ठाण्यात 14 जुलै रोजी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा हिच्या नावाचा वापर करुन आरोपीने इंस्ट्राग्रामवर नेहा डॉट हिंगे या नावाचे बनावट प्रोफाईल तयार केले. त्यावर तिचा फोटो अपलोड करुन वैशाली नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपवर त्याने अश्लिल मेसेज पाठवून शिवीगाळ केली. या सर्वांचा मानसिक त्रास होत असल्याामुळे नेहाने असे घाणेरडे मेसेज पाठवू नका असे सांगितले होते. सायबर गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक विजयमाला पवार यांना आरोपीबाबत मिळालेल्या माहितीवरुन ओझाला अटक करण्यात आली.