अभिनेता तुषार कपूरला पुत्ररत्न

By Admin | Updated: June 28, 2016 05:31 IST2016-06-28T05:31:50+5:302016-06-28T05:31:50+5:30

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर याला आठवडाभरापूर्वी पुत्ररत्न झाले आहे.

Actor Tusshar Kapoor, son-in-law | अभिनेता तुषार कपूरला पुत्ररत्न

अभिनेता तुषार कपूरला पुत्ररत्न


मुंबई : बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर याला आठवडाभरापूर्वी पुत्ररत्न झाले आहे. सरोगसीच्या माध्यमातून तुषार कपूरला मुलगा झाला असून, त्याचे नाव ‘लक्ष्य’ ठेवले आहे. बाळाची प्रकृती उत्तम असून, त्याला घरी नेण्यात आले आहे. जसलोक रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला.
तुषार कपूरला बाबा होण्याची इच्छा होती. त्यामुळे लग्न न करता बाबा होण्यासाठी त्याने सरोगसीचा मार्ग स्वीकारला. गेल्या आठवड्यात तुषारच्या बाळाचा जन्म झाला. बाळ जन्माला आल्यावर लगेच रडले. बाळाचे वजन योग्य आहे. प्रकृती चांगली असल्यामुळे तुषार कपूरला बाळाला घेऊन घरी जाण्याची परवानगी दिल्याची माहिती वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. फिरुजा पारेख यांनी ‘लोकमत’ला दिली. तुषार कपूर यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. लग्न न करता आई-वडील होण्याची इच्छा असल्यामुळे त्यांच्या समोर दोन मार्ग होते. त्यातला सरोगसीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. त्याआधी त्यांनी व्यवस्थित विचार केला होता. त्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यांनी सर्व कायदेशीर बाबी, कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. त्यानंतरच बाळाला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचेही डॉ. पारेख यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Actor Tusshar Kapoor, son-in-law