अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
By Admin | Updated: April 1, 2016 21:59 IST2016-04-01T21:59:52+5:302016-04-01T21:59:52+5:30
बालिका वधू मालिकेत आनंदीची भुमिका करणा-या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १ - बालिका वधू मालिकेत आनंदीची भुमिका करणा-या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. गोरेगावमधील तिच्या राहत्या पोलिसांना मृतदेह आढळला आहे. गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून नेमकं कारण काय आहे ? याचा पोलीस तपास करत आहे. कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले.
प्रत्युषा बॅनर्जीने वैयक्तिक आयुष्यातील समस्येमुळे आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रियकरासोबत सुरु असलेल्या वादामुळे हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.बालिका वधू मालिकेनंतर प्रत्युषा नावारुपाला आली होती त्यानंतर बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.