शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

Maharashtra Politics: “जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद जुना, आता...”; केतकी चितळेचा अमृता फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 14:22 IST

Maharashtra Politics: अमृता फडणवीस यांच्या विधानासंदर्भात केतकी चितळेने सोशल मीडियावरून भाष्य केले आहे.

Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, नागपूरमधील कथित भूखंड घोटाळा आणि या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी यांसह अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेनेही यावर भाष्य केले आहे. 

अमृता फडणवीस नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, अभिरूप न्यायालयात सहभागी झाल्या होत्या. तिथे नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. माझा आरोप असा आहे की, जर नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता असतील तर महात्मा गांधी कोण आहेत? असा प्रश्न मुलाखतकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. असे माझे ठाम मत आहे. आपले दोन राष्ट्रपिता आहेत, नरेंद्र मोदी हे आताच्या नवीन भारताचे तर महात्मा गांधी हे तेव्हाच्या काळातील राष्ट्रपिता आहेत, असे विधान अमृता फडणवीस यांनी केले. यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर केतळी चितळेने प्रतिक्रिया दिली आहे. 

जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद जुना, आता...

केतकी चितळेने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. जुने विरुद्ध नवे गुरु आणि जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होत चालला आहे. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय आणि आता आपण स्वत:लाही बदलायची वेळी आली आहे. त्यामुळे आता ३ हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या १०० वर्षे झाली आहेत, हे सत्यही आपण स्वीकारायला हवे, असा टोला तिने अमृता फडणवीसांना लगावला आहे.  जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय  जागो मेरे देश, असेही केतकीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, केतकी चितळेची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तसेच तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचेही पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसKetaki Chitaleकेतकी चितळे