मुलींची शाळेतील गळती थांबविण्यासाठी उपक्रम
By Admin | Updated: September 3, 2014 02:36 IST2014-09-03T02:36:15+5:302014-09-03T02:36:15+5:30
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींचे शाळा सोडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे.

मुलींची शाळेतील गळती थांबविण्यासाठी उपक्रम
पुणो : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींचे शाळा सोडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. तेथील समस्यांचा आढावा घेऊन मुलींची शाळांमधील गळती थांबविण्यासाठी लवकरच विशेष उपक्रम राबविला जाईल. तसेच राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील सुमारे 97 टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृह असून काही ठराविक जिल्ह्यांमधील शाळांमध्ये काही कारणास्तव स्वच्छतागृह उभारता आलेले नाही. स्वच्छतागृह नसल्यामुळे मुली शाळेत येत नाहीत हे सुद्धा मुलींच्या शाळांमधील गळतीचे एक कारण असू शकते, असेही त्यांनी नमूद केले. भिडे म्हणाल्या, राज्यात सुमारे 1,2क्क् शाळांमध्ये स्वच्छतागृह नसल्याची माहिती उपलब्ध आहे. परंतु, स्वच्छतागृह आणि किचन शेड बांधण्याचे काम पावसाळा संपल्यानंतर तात्काळ पूर्ण केले जाईल. त्याचप्रमाणो मुलींची गळती थांबविण्यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण उपसंचालक व अधिका:यांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविणो, प्रत्येक विद्याथ्र्याला शिक्षकांनी कसे शिकवावे यासंदर्भातील मार्गदर्शन शिक्षण उपसंचालकांच्या माध्यमातून केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सर्व शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त ऐकवावे अशी सक्ती करण्यात आलेली नाही, असे केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्रलयाने स्पष्ट केले आहे. मात्र, राज्यातील शाळांनी विद्याथ्र्यार्पयत पंतप्रधानांचे भाषण पोहचविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना शिक्षण अधिका:यांमार्फत शाळांना दिल्याची माहिती भिडे यांनी दिली.