कार्यकत्र्यानी पकडली सेना खासदाराची गचांडी

By Admin | Updated: November 23, 2014 02:48 IST2014-11-23T02:48:06+5:302014-11-23T02:48:06+5:30

राज्य आणि केंद्रात सेना-भाजपाचे तळ्यात-मळ्यात सुरू असतानाच शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना भाजपा पदाधिका:यांनी धक्काबुक्की केली.

Activist caught the cows of the MP | कार्यकत्र्यानी पकडली सेना खासदाराची गचांडी

कार्यकत्र्यानी पकडली सेना खासदाराची गचांडी

उस्मानाबाद : राज्य आणि केंद्रात सेना-भाजपाचे तळ्यात-मळ्यात सुरू असतानाच शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना भाजपा पदाधिका:यांनी धक्काबुक्की केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोरच शनिवारी दुपारी येथे हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीवरून हा वाद झाल्याचे समजते. मात्र धक्काबुक्की नव्हे, तर गायकवाड यांच्याशी ‘तू-तू, मैं-मैं’ झाल्याचा दावा भाजपा पदाधिका:यांनी केला आहे.
टंचाई आढावा बैठकीसाठी महसूलमंत्री खडसे शनिवारी उस्मानाबादेत आले होते. सकाळी तालुक्यातील सकनेवाडी येथे त्यांच्या हस्ते ई-जमीन मोजणी उपक्रमातील सहभागी ग्रामस्थांना  प्रमाणपत्रंचे वितरण करण्यात आले. त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या समर्थनगर भागातील निवासस्थानी चहा-पान करून जिल्हाधिकारी कार्यालयात होणा:या आढावा बैठकीला ते जाणार होते. काळे यांच्या निवासस्थानी त्यांचे चहा-पान सुरू असताना खडसे यांना भेटण्यासाठी खा. गायकवाड तेथे आले असता भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय निंबाळकर यांच्याशी विधानसभा निवडणुकीवरून चर्चा झाली. याच चर्चेचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाल्याने तेथे जमलेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी काही कार्यकत्र्यानी गायकवाड तसेच निंबाळकर यांची समजूत घालून वाद मिटविण्याचा प्रय} केला. पण बाचाबाची विकोपाला गेली. शेवटी  पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. (प्रतिनिधी)
 
हा घरातला विषय : खडसे
घटना घडली त्यावेळी मी स्वत: तिथे होतो. शिवीगाळ अथवा मारहाणीसारखा कसलाही प्रकार घडला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढलेल्या आहेत. याच विषयावरून या दोघांमध्ये एकमेकांविषयी काही विचारणा झाली. हा विषय घरातला आहे. त्यामुळे याला फारसे महत्त्व देऊ नये, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. 
 
गायकवाड म्हणतात..
खडसे हे वरिष्ठ नेते आहेत. ते घडलेल्या प्रकाराबाबत बोलले आहेत. त्यामुळे याबाबत मी आणखी काही बोलणो ईष्ट होणार नाही, अशी प्रतिक्रिया खा. रविंद्र गायकवाड यांनी दिली.
 
संजय निंबाळकर म्हणतात..
खा. गायकवाड यांना आपण इकडे कसे काय, असे विचारले असता त्यांनी असंसदीय शब्दप्रयोग केला. त्यामुळे बाचाबाची झाली. मात्र, धक्काबुक्की अथवा मारहाण झाली नसल्याचे संजय निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 
 

 

Web Title: Activist caught the cows of the MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.