नागपुरात ‘रिलायन्स’विरुद्ध कारवाई होणार
By Admin | Updated: March 23, 2017 23:58 IST2017-03-23T23:58:58+5:302017-03-23T23:58:58+5:30
नागपूरजवळील बुटीबोरी येथे असलेल्या रिलायन्स कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पामुळे जवळच्या कृष्णा नदीत झालेले प्रदूषण

नागपुरात ‘रिलायन्स’विरुद्ध कारवाई होणार
मुंबई : नागपूरजवळील बुटीबोरी येथे असलेल्या रिलायन्स कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पामुळे जवळच्या कृष्णा नदीत झालेले प्रदूषण आणि फ्लॅय अॅशची नीट विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल सदर कंपनीविरुद्ध येत्या आठ दिवसांत कारवाई केली जाईल, असे आश्वास मंत्री रामदास कदम यांनी दिले. भाजपाचे समीर मेघे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
या ठिकाणचे प्रदूषित पाणी आणि फ्लॅय अॅशविरुद्ध आपण या पूर्वीदेखील तक्रार केलेली आहे. लोकांच्या आरोग्यांशी खेळण्याचे प्रकार या परिसरात हा प्रकल्प करीत आहे, असा आरोप मेघे यांनी केला. याशिवाय, वेणा नदी प्रदूषणग्रस्त होऊ नये म्हणून मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याची मागणी त्यांनी केली.