पनवेलमध्ये अतिक्रमणांवर होणार कारवाई

By Admin | Updated: November 4, 2016 02:36 IST2016-11-04T02:36:40+5:302016-11-04T02:36:40+5:30

महानगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

Action will be taken against encroachments in Panvel | पनवेलमध्ये अतिक्रमणांवर होणार कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणांवर होणार कारवाई


पनवेल : महानगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेल शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात अतिक्र मण करणाऱ्यांना नोटिसा पाठवून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरात फुटपाथ, रस्ते यावर अतिक्र मण करून फेरीवाल्यांनी बकाल स्वरूप प्राप्त केले आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून चालता येत नाही. रस्त्यांवरून चालावे लागते. परिणामी अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लवकरच अतिक्र मण काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कळंबोली सर्कलपासून खांदा कॉलनी, नवीन पनवेल शहरातील अतिक्र मण केलेले रस्ते, फुटपाथवर कारवाई केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरातील अतिक्र मण हटविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त मंगेश चितळे यांनी दिली. पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल शहराला स्वच्छ, सुंदर व स्मार्ट करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्यांदा शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत हजारो बेकायदा फलक काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता महापालिका हद्दीतील अतिक्र मण हटविण्यात येणार आहे. शहरात हॉटेल, हॉस्पिटल, दुकाने, फेरीवाले, यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. हातगाडी चालकांनी तर पनवेल शहराचे नावच बदनाम केले आहे. त्यामुळे या सर्वांवर काही दिवसातच कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
फेरीवाले, हातगाडी चालकांनी रस्त्यांवर अतिक्र मण केल्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. तसेच कपड्यांच्या दुकानाबाहेर शिलाई चालकांनी आपली यंत्रे थाटली आहेत. त्यामुळे या सर्वांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Action will be taken against encroachments in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.