एलबीएसवरील अनधिकृत दुकानांवर कारवाई
By Admin | Updated: July 23, 2016 02:13 IST2016-07-23T02:13:48+5:302016-07-23T02:13:48+5:30
महाराष्ट्र काटा ते सुर्वे चौकदरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुमारे ८० अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

एलबीएसवरील अनधिकृत दुकानांवर कारवाई
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील ‘एल’ विभागातील महाराष्ट्र काटा ते सुर्वे चौकदरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुमारे ८० अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली.
४ जुलै रोजी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत तसेच १८ जुलैच्या परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीत लाल बहादूर शास्त्री मार्गावरील अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स हटविण्याच्या सूचना आयुक्त अजय मेहता यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या नेतृत्वाखाली ‘एल’ विभागातील ३५ जणांच्या चमूने ही कारवाई केली. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या २० जणांच्या चमूचे सहकार्य घेण्यात आले. ही कारवाई पुढील आठवड्यातही सुरू राहणार आहे, असे ‘एल’ विभागाचे साहाय्यक आयुक्त अजयकुमार आंबी यांनी सांगितले.
‘एल’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईवेळी ३० अनधिकृत स्टॉल्स व ५० दुकाने हटविण्यात आली आहेत. या कारवाईसाठी महापालिकेच्या चमूमध्ये अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्यासह ३५ जणांचा समावेश होता. तर दोन जेसीबी, दोन डंपर, सहा टेम्पो इत्यादी वाहनांचाही वापर कारवाईसाठी करण्यात आला. या कारवाईमुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. (प्रतिनिधी)
>परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या नेतृत्वाखाली ‘एल’ विभागातील ३५ जणांच्या चमूने ही कारवाई केली. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या २० जणांच्या चमूचे सहकार्य घेण्यात आले. ही कारवाई पुढील आठवड्यातही सुरू राहणार आहे, असे ‘एल’ विभागाचे साहाय्यक आयुक्त अजयकुमार आंबी यांनी सांगितले.