अनधिकृत इमारतीवर कारवाई

By Admin | Updated: July 1, 2016 02:51 IST2016-07-01T02:51:14+5:302016-07-01T02:51:14+5:30

सानपाडा सेक्टर ५ येथील तळमजला अधिक चार मजली अनधिकृत इमारतीवर सिडकोने गुरूवारी धडक कारवाई केली.

Action on unauthorized buildings | अनधिकृत इमारतीवर कारवाई

अनधिकृत इमारतीवर कारवाई


नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ५ येथील तळमजला अधिक चार मजली अनधिकृत इमारतीवर सिडकोने गुरूवारी धडक कारवाई केली. या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत सानपाड्यातील सेक्टर ५ मध्ये नरेश कृष्णा नाईक यांनी प्लॉट क्रमांक १५९ वर उभारलेल्या चार मजली इमारतीवर गुरूवारी बुलडोझर फिरविण्यात आला. या कारवाईच्या वेळी ग्रामस्थांनी रस्त्यावर आडवे होवून अतिक्रमण विभागाचा बुलडोझर अडविण्याचा प्रयत्न केला. यात महिलांची संख्या मोठी होती. यावेळी पोलिसांनी बळाचा केल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांना दूर केल्यानंतर दुपारी दीड वाजता इमारत पाडण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. सायंकाळपर्यंत इमारतीचे तीन मजले जमीनदोस्त करण्यात आले. शुक्रवारी पुन्हा याच परिसरात अन्य बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रक (उत्तर) पी.बी. राजपूत यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी महिलांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर सिडकोच्या या कारवाईच्या विरोधात येत्या काळात पुन्हा आंदोलन चिघळण्याची
शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action on unauthorized buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.