नॅक मूल्यांकन न केल्यास कारवाई
By Admin | Updated: September 14, 2015 02:33 IST2015-09-14T02:33:19+5:302015-09-14T02:33:19+5:30
नॅशनल अॅसेसमेंट व अॅक्रिडेशन कौन्सिलकडून (नॅक) मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालये आणि विद्यापीठांवर आता कारवाई होणार आहे

नॅक मूल्यांकन न केल्यास कारवाई
मुंबई : नॅशनल अॅसेसमेंट व अॅक्रिडेशन कौन्सिलकडून (नॅक) मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालये आणि विद्यापीठांवर आता कारवाई होणार आहे.
तसे आदेश उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यापीठांना दिले आहेत. दरम्यान, नॅक मूल्यांकन टाळणाऱ्या राज्यातील अकृषी विद्यापीठांचे अनुदान बंद करण्याचे आदेशही शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. अकृषी विद्यापीठांनी तिमाही आढावा घेऊन त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत संबंधित उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक किंवा संचालकांकडे सादर करण्याचा उल्लेख आदेशात आहे. (प्रतिनिधी)