शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंदी झुगारून वडजला बैलगाडा शर्यती, जुन्नर पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 22:39 IST

जुन्नर : श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान असलेल्या वडज (ता. जुन्नर) येथे बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानादेखील रविवारी दुपारी शर्यती भरविण्यात आल्या.

जुन्नर : श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान असलेल्या वडज (ता. जुन्नर) येथे बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानादेखील रविवारी दुपारी शर्यती भरविण्यात आल्या. या प्रकरणी जुन्नर पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर आयोजकांनी बैलगाडा शर्यती बंद करून पोबारा केला.  बैलगाडा शर्यतीप्रकरणी प्रत्यक्षदर्शनी  दिलेल्या महितीप्रमाणे जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी येथे बैलगाडा शर्यती भरविण्यात येणार होत्या.मात्र, वडगाव सहानी येथील शर्यतीचे   ठिकाण बदलून अचानकपणे वडज येथील घाटावर बैलगाडा शर्यती भरविण्यात आल्याचे समजले. वडज येथे श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान असून पूर्वी या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यती भरविल्या जात होत्या. मात्र शर्यंतीना बंदी असल्याने वडज येथे शर्यतीचे आयोजन होत नव्हते. मात्र रविवार ५ रोजी अचानकपणे बैलगाडा शर्यती अज्ञातांनी आयोजित केल्याचे समजले. बैलगाडा शर्यतीचा आनंद घेण्यासाठी जवळपास सातशेहून अधिक  बैलगाडा शर्यत शौकीन यावेळी उपस्थित होते. चाकण, मंचर, कबाडवाडी, निमदरी, वडगाव सहानी, वैष्णवधाम, सावरगाव यासह अन्य भागातून जवळपास शंभरहून अधिक बैलगाडा शौकिन  उपस्थितीत होते. जुन्नर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती मिळाल्यावर जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच बैलगाडा शर्यती बंद करण्यात आल्या. पोलीस येत असल्याचे समजताच आयोजक व सहभागी यांनी बैलगाडा घाटावरून पोबारा केला. पोलिसांनी बैलगाडा शर्यतीचे तसेच लाऊड स्पीकर व मंडप साहित्य जप्त केले. दरम्यान, जुन्नर पोलीस ठाण्यात रात्री  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Puneपुणे