वरळीतील ‘शुभदा-सुखदा’वर कारवाई अटळ
By Admin | Updated: December 16, 2014 03:32 IST2014-12-16T03:32:27+5:302014-12-16T03:32:27+5:30
वरळीमधील शुभदा-सुखदा या आलिशान इमारतीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. येथील सोसायटीतील रहिवाशांनी बेकायदा

वरळीतील ‘शुभदा-सुखदा’वर कारवाई अटळ
मुंबई : वरळीमधील शुभदा-सुखदा या आलिशान इमारतीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. येथील सोसायटीतील रहिवाशांनी बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली की नाही, याची पाहणी करण्याकरिता १८ डिसेंबर रोजी पालिकेचे पथक शुभदा-सुखदाकडे रवाना होणार आहे. आणि त्यानंतर येथील बेकायदा बांधकामावर हातोडा मारण्यात येणार असल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे.
शुभदा-सुखदामधील बारा फ्लॅटमध्ये बेकायदा बदल, कार्यालयातील बदल, वाहनांच्या जागेवर दुकाने बांधण्यात आली होती. यावर महापालिकेने १२ एप्रिल रोजी येथील बारा फ्लॅटधारकांना नोटीस बजावली. बेकायदा बांधकाम पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, अजित पवार, शिवराज पाटील, अनिल देशमुख, सलील देशमुख, माणिकराव ठाकरे, रणजित देशमुख, अण्णा डांगे, प्रतापसिंह मोहिते आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना यापूर्वी नोटीस बजावली होती, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.