झोपडपट्टीदादांप्रमाणे वाळूमाफियांवर कारवाई

By Admin | Updated: March 14, 2015 05:49 IST2015-03-14T05:49:53+5:302015-03-14T05:49:53+5:30

मुजोर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील झोपडपट्टीदादांवर कारवाई

Action on sand mafia like slums | झोपडपट्टीदादांप्रमाणे वाळूमाफियांवर कारवाई

झोपडपट्टीदादांप्रमाणे वाळूमाफियांवर कारवाई

मुंबई : मुजोर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील झोपडपट्टीदादांवर कारवाई करण्याकरिता केलेल्या महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्ट (एमपीडीए) खाली वाळूमाफियांवरही कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केली. राज्याचे वाळू धोरण येत्या महिनाभरात जाहीर करण्यात येईल, असेही खडसे यांनी सांगितले.  शेकापच्या जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील विनापरवाना वाळू उपशाबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावर पाटील यांनी वाळू माफियांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. महसूलमंत्री खडसे म्हणाले की, या कारवाया रोखण्याकरिता झोपडपट्टीदादांवर कारवाई करण्याकरिता केलेल्या एमपीडीए कायद्याचा निश्चित वापर केला जाईल. त्याकरिता आवश्यकता वाटल्यास त्या कायद्यात सुधारणा करु. वाळू उपशावर बंदी घालण्याबाबत एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. राज्याने आपले नवे वाळू धोरण जाहीर करावे, अशी सूचना या याचिकांच्या सुनावणीत पुढे आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, बिल्डर अशा सर्व संबंधितांशी चर्चा करून हे धोरण तयार केले जाईल, असे खडसेंनी सांगितले. कोकणातील जांबा दगड काढण्यावरील बंदीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकरांकडे झालेल्या बैठकीत मार्ग काढण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वाळू काढण्याबाबतही निर्णय घेण्याचे आश्वासन खडसे यांनी दिले.

Web Title: Action on sand mafia like slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.